उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- गडचिरोलीजिल्हा आदिवासी,बहुल, नक्षलग्रस्त व मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो.जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये शासन स्तरावरून मंजूर केली जातात.कोट्यवधी रुपये मंजूर करूनही जिल्ह्याचा विकास काई होईना..! अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे.कारण की,बाहेरील व्यक्ती जिल्ह्यात उडी घेऊन सर्व माल डब्ब्यात घेऊन निघून चालले जात असल्याचे विदारक चित्र निदर्शनास येऊ लागले आहे.अशातच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी चामोर्शी-हरणघाट मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीला घेऊन काल दिनांक-१४ ऑक्टोंबर २०२३ रोजी रस्त्यावर उतरीत रस्ता रोको आंदोलन करून ज्यांची राज्यात व केंद्रात सत्ता असूनही त्यांनीच खलबत्ता करून विरोधकांच्या टीकेला अधोरेखित केल्याचे दिसून येते.
सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.अशातच भाजपच्याच आमदारांना खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत असेल तर मग सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.भाजपचे आमदार डॉ.देवराव होळी हे नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत असतात.यापूर्वी त्यांनी विधानसभेत सांगितले की,गडचिरोली जिल्ह्याचा विकास झालाय;असे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर टीकेची आगपाखड ओकण्यात आली होती.तसेच त्यांना आदिवासी समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.परत पुन्हा स्वतःच्याच विधानसभेत चामोर्शी-हरणघाट मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या मागणीला घेऊन रास्ता रोको आंदोलन केल्याने; पक्षातील आमदाराला खड्डे बुजविण्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याने जिल्ह्यात विकासाची किती बिकट अवस्था आहे; अशी टीका विरोधकांनी केली आहे.