- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांना राशन दुकानात ई-केवायसी प्रक्रिया करणे शासन स्तरावरून अनिवार्य करण्यात आले आहे.याकरिता पुरवठा विभागाद्वारे वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली असली तरीही अजूनपर्यंत बऱ्याच लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही.त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अजून पर्यंत ई-केवायसी केली नाही,अश्यांनी तात्काळ केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी,अन्यथा राशन कार्डवरील नाव कमी होऊन धान्यापासून वंचित रहावे लागणार आहे.
ई-केवायसी प्रक्रिया ही राशन दुकानात असलेल्या ई-पॉस मशीनवर केली जाते.सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अपात्र असलेल्या काही नागरिकांव्दारे राशन धान्याचा लाभ घेतला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर यामध्ये लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याचे निर्देश शासनाव्दारे देण्यात आले आहे.वारंवार सूचना दिल्यानंतरही ई-केवायसी न करणाऱ्या लाभार्थ्यांची शिधापत्रिकेमधून नाव कमी केले जाणार असून अश्यांना धान्य दिले जाणार नाही.त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही,अश्यांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानामधून ई-केवायसी करून घ्यावी.तसेच जे लाभार्थी गाव सोडून कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत,त्यांनी तेथील स्वस्त धान्य दुकानामधून किंवा आपल्या मोबाइलमध्ये ‘मेरा ई-केवायसी ॲप’ डाऊनलोड करून त्यामधून केवायसी पूर्ण करून घ्यावी,असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
- Advertisement -

