- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ परत घेतला जाईल,असे राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.काल मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना लाडकी बहीण योजनेवरील शासनाची भूमिका स्पष्ट केली.खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे,या महिलांना मिळालेले पैसे सरकार परत घेणार काय? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्या म्हणाल्या,ज्या महिलांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला,त्यांच्याकडून पैसे पुन्हा सरकारी तिजोरीत जमा केले जातील.हे पैसे लोकोपयोगी, लोककल्याणकारी कामांसाठी व विविध योजनांसाठी वापरले जातील.
राज्यातील साडेचार हजार महिलांनी स्वतःहून पुढे येत आपले अर्ज मागे घेतले आहेत.मात्र,अजूनही अनेक महिला चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेत आहेत.यावर अदिती तटकरे म्हणाल्या,सरकारची स्वतःची स्वतंत्र पडताळणी व्यवस्था आहे.त्याअंतर्गत आम्ही परिवहन विभागाशी समन्वय साधून काम करत आहोत.ज्या महिलांनी निकषांत बसत नसतांनाही या योजनेचा लाभ घेतला,त्यांच्या अर्जाची पडताळणी स्वतंत्र व्यवस्थेद्वारे केली जाईल.
विशेषतः,ज्या महिला लग्न करून राज्याबाहेर गेल्या आहेत किंवा ज्या महिला राज्याबाहेर राहत आहेत तसेच,गेल्या पाच महिन्यांत ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली आहे,त्यांची यादीही या अर्ज पडताळणी प्रक्रियेद्वारे समोर येईल.त्यामुळे निश्चितच अशा महिलांकडूनही पैसे परत घेतले जातील.
मार्च महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर बजेटनंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात २,१०० रुपये जमा होणार असल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आयोजित जाहीर नागरी सत्काराच्या कार्यक्रमात सांगितले.या योजनेचा जानेवारीचा हप्ता २६ तारखेपूर्वीपासून मिळणार असून सरकारने त्यासाठी ३,६९० कोटी रुपये महिला व बालविकास
विभागाकडे सुपूर्द केले आहेत.
- Advertisement -