Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीअनुसूचित जमातीच्या बचत गटांनी शेळी गट मिळण्यासाठी अर्ज आंमत्रित- १३ एप्रिल शेवटची...

अनुसूचित जमातीच्या बचत गटांनी शेळी गट मिळण्यासाठी अर्ज आंमत्रित- १३ एप्रिल शेवटची तारीख 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई क्र.केंद्रीय २०२१/प्र.क्र.४३/का.१९ दिनांक- २६ जुलै २०२२ अन्वये  सन २०१४-१५ या आर्थीक वर्षातील विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत Supply of Goat Units to women SHGs ( १० Female + १ Male ) ही योजना मंजुर असुन सदर योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या बचत गटांना १० शेळी व १ बोकड वाटप करण्यात येणार आहे.

प्रकल्प कार्यालय,गडचिरोली करीता ३३ लाभार्थ्याकरीता ४८.६६ लक्ष निश्चिीत करण्यात आलेली असुन कार्यालया अंतर्गत येत असलेले १) गडचिरोली २) चामोर्शी ३) धानोरा ४) आरमोरी ५) कुरखेडा ६) वडसा ७) कोरची तालुक्यातील  अनुसूचित जमातीच्या बचत गटांनी शेळी गट मिळण्यासाठी जास्तीत जास्त अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे १३ एप्रिल २०२३ पर्यत सादर  करण्यात यावे.

योजनेच्या अटी शर्ती 👇 

महिला बचत गट नोंदणीकृत दाखला हा अनुसूचित जमातीचा असावा.महिला बचत गटातील किमान एका सदस्याकडे ७/१२ दाखला असणे आहे.शेळायांना पिण्याच्या पाणी उपलब्ध असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला आवश्यक आहे.बचत गटातील सदस्य अथवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी सदर  योजनेचा लाभ यापुर्वी आदिवासी विकास किंवा इतर कोणत्याही शासकीय  विभागामार्फत घेतलेला नाही. याबाबतचे सक्षम प्राधिकार/संबंधित ग्रामंपायतीचा ना हरकत दाखला जोडणे आवश्यक आहे.

गटास देण्यात आलेली शेळी गटांनी युनिट लाभार्थीकडुन विक्री करता येणार नाही किंवा एकाच लाभधारक कुटुंबाकडे एकापेक्षा अधिक लाभधारकाचे पशु एकाच ठिकाणी संगोपित केली जाणार नाही.महिला बचत गटानी  योजनेचा अटी व शर्तीनुसार रु.१००/- मुद्रांकावर करारनामा करुन देणे बंधनकार राहिल.योजना राबविण्याचा ठिकाणी विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजुर योजना सन २०१४-१५ अंतर्गत महिला बचत गटांना शेळी गटाचा पुरवठा करणे या आशयाचा नामफलक लावणे बंधनकारक राहिल.असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

‘या’ उमेदवारांना मिळणार मुलाखतीची तयारी करण्यासाठी १० हजाराचे आर्थिक सहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-२०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची तयारी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व...

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!