Tuesday, June 16, 2026
Homeगडचिरोलीअनधीकृत एचटीबिटी बियाणे आढळून आल्यास  दाखल होणार गुन्हा...- शेतकऱ्यांनी अनधिकृत एचटीबीटी बियाणे...

अनधीकृत एचटीबिटी बियाणे आढळून आल्यास  दाखल होणार गुन्हा…- शेतकऱ्यांनी अनधिकृत एचटीबीटी बियाणे खरेदी करू नये….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी एचटीबीटी (चोर बीटी) बियाणे खरेदी करू नये; असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सध्या बाजारात बोगस बियाणे खाजगी व्यक्तींमार्फत छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे.अशा अवैध बियाण्यांना शासनाची कोणतीही मान्यता नाही.अश्या प्रकारचे बियाणे विक्री करणे, बाळगणे,साठा करणे गुन्हा आहे.या प्रकारचे लागवड केलेल्या कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपसणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे.यात एचटीबीटी आढळून आल्यास संबंधितावर कार्यवही करण्यात येणार आहे.सदर एचटीबीटी लागवड केल्याने जामिनाचा ऱ्हास होऊन जमिनी कालंतराने नापीक होतात.मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो.तरी शेतकऱ्यांनी अधिकृत कापूस बियाणे लागवड करावे.एखाद्या व्यक्तीकडे अनाधीकृत एचटीबिटी बियाणे आढळून आल्यास अशांवर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात येईल.

संजय मेश्राम जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गडचिरोली 👇

एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्या लोकांवर कृषी विभाग लक्ष ठेवून असून आम्ही टीम ॲक्तीव केली असून आष्टी परिसर व आजूबाजूच्या परिसरात स्वत; लक्ष देऊन आहोत.संशायीत ठिकाणच्या झडती घेणे सुरु आहे.शक्य तिथे पोलीस विभागाची मदत घेतली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन.. – सप्तखंजिरीवादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज होणार सहभागी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नीटच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा,या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज, मंगळवार १६ जून २०२६ रोजी...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!