Thursday, October 1, 2026
Homeगडचिरोलीअधिकारी,कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सुट्ट्या संपणार की नाही? -नागरिकांची कामे खोळंबली; सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या...

अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सुट्ट्या संपणार की नाही? -नागरिकांची कामे खोळंबली; सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या कमी कऱ्याव्यात…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- शासकीय कार्यालय सलग दहा दिवस बंद असले; तर अनेकांना मोठा फटका बसतो.त्यांची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत.आधीच सरकारी काम सहा महिने थांब; अशी परिस्थिती असल्याने त्यामध्ये गोरगरीब नागरिकांच्या कामांना उशीर होतो.त्यामुळे अनेकांची कामे आता सोमवारी म्हणजेच आज तरी होणार काय?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.अशातच आजही अनेक अधिकारी, कर्मचारी आपल्या कार्यालयात उपस्थित नसल्याने शासनाने सुट्ट्यांचे नियोजन करण्याची गरज आहे.अन्यथा सरकारी कर्मचारी ‘आम भरो पोट भरो..! सर्वसामान्य नागरिक कामासाठी हेलपाट्या मारून मरो…! अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.

दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या असल्या तरीही अधिकारी व कर्मचारी मात्र अजूनही दिवाळी सुट्टी साजरी करण्यात मग्न आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवार,११ नोव्हेंबर ते बुधवार १५ नोव्हेंबरपर्यंत सलग पाच दिवस शासकीय सुट्टया होत्या; तसेच आठवड्यात गुरुवार,शुक्रवार दोनच दिवस कार्यालये सुरू होती.परिणामी काही नागरिकांची आवश्यक कामे अडकून पडली.त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टया कमी करण्यात याव्यात; असा सूर सध्या जनतेमधून उमटत आहे.शनिवार व रविवारची सुट्टी आल्याने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांची वैयक्तिक सुट्टी घेतली.यामुळे जनतेची मोठी गैरसोय झाली आहे.शनिवार,रविवार नियमित व शासनाच्या तीन सुट्टया मिळून शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सलग पाच दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद उपभोगता आला.त्यातही जिल्ह्यातील इतर तालुक्यांत कार्यरत अधिकारी,कर्मचाऱ्यांनी पुन्हा गुरुवार,शुक्रवारची वैयक्तिक सुट्टी घेतल्याने त्यांना शनिवार,रविवार मिळून सलग १० दिवसांच्या सुट्टया मिळाल्या आहेत.मात्र यात सामान्य नागरिकांची मोठी फजिती झाली आहे.तहसील कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय,पंचायत समिती,कृषी कार्यालय, परिवहन कार्यालय, नगरपंचायत, ग्रामपंचायत,नगरपालिका,आदी कार्यालयांशी ग्रामीण नागरिकांचा व शहरी नागरिकांचा थेट संपर्क येतो.सण संपला असूनही अनेक कार्यालयांमध्ये आजच्या स्थितीत शूकशुकाट दिसून येतोच आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या कामांशी कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या कमी कऱ्याव्यात; असा बोलबाला सर्वत्र सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-दोन दुचाकींच्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला,तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल बुधवारच्या मध्यरात्री गोंदिया-गोरेगाव मार्गावर घडली.पीयूष...

अखेर उद्या होणारा व्यापारी संघटनांचा ‘नो यूपीआय डे’ मागे..!

उद्रेक न्युज वृत्त :-यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.या निर्णयाचा तीव्र निषेध...

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!