उद्रेक न्युज वृत्त
नांदेड :- शहरात आश्र्चर्य कारक घटना घडली असून वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्रीकांत सोनटक्के वीज बिल वसुलीसाठी स्नेह नगर पोलीस वसाहतीत गेले असता एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्याच्या मीटरमधून अनधिकृतपणे वीज कनेक्शन घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.पोलीस कर्मचाऱ्याकडे विचारना करण्यासाठी सोनटक्के जाताच पोलीस कर्मचारी निवृत्ती केंद्रे यांनी सोनटक्के यांच्या नाकावर बुकीचा ठोसा मारला.पोलीस कर्मचाऱ्याने नाकावर बुकिचा जोरभर ठोसा मारताच सोनटक्के यांचे दोन दात पडले.घटनेमुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी चांगलेच धास्तावले असून विचारना करतांना आता सांभाळून विचारणा करावी लागणार व कोणता ग्राहक कोणत्या मनःस्थितीत असेल याचा काही नेम नाही.