Monday, August 17, 2026
Homeमध्य प्रदेशअजबच......पण गजबच....आरोग्य विभागाने तब्बल ८० हजारांची माहिती दिली फुकट....- कागदपत्राने संपूर्ण कारच...

अजबच……पण गजबच….आरोग्य विभागाने तब्बल ८० हजारांची माहिती दिली फुकट….- कागदपत्राने संपूर्ण कारच गेली भरून……- ३० दिवसात माहिती न देणे पडले महागात….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मध्य प्रदेश(इंदूर) :- आपण नेहमीच बघत असतो की,माहिती अधिकारात मागितलेली माहिती वेळेवर म्हणजेच ३० दिवसात दिली जात नाही.३० दिवसात माहिती दिली नाही तर अशी माहिती अपील कर्त्याला फुकटात देणे बंधनकारक आहे.मात्र हल्ली सगळीकडेच टोलवा-टोलवीचे प्रकार दिसून येत येतात.अशातच अजबच……पण गजबच…. असा प्रकार मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात माहिती अधिकारा अंतर्गत उघडकीस आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते धर्मेंद्र शुक्ला यांनी कोरोना काळात इंदूर जिल्हा प्रशासाच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या साहित्यांची माहिती मागविली होती.त्यानुसार त्यांनी व्हेंटिलेटर्स,मास्क,औषध आणि आरोग्याशी संबंधित अन्य वस्तू यांच्या तपशिलाची माहिती मागविली.आरोग्य विभागाने शुक्ला यांना माहिती घेण्यास बोलावले असता संपूर्ण कागदपत्रे ४० हजाराच्या आसपास होते.कागदपत्रे नेण्यासाठी शुक्ला यांनी चक्क सफारी कारच घेऊन गेले.कागद पत्रांनी संपूर्ण कार भरून गेली.शुक्ला यांनी आरोग्य विभागास माहिती मागितली.मात्र त्यांना विहित मुदतीत माहिती मिळाली नाही.त्यानुसार त्यांनी ३२ व्या दिवशी अपील केले.त्यानुसार आदेश काढण्यात आला व संपूर्ण माहिती १५ दिवसात फुकटात मिळाली.४० हजार कागद पत्रांचे २ रुपये प्रति प्रमाणे ८० हजार रुपयांना शासनास चुना लागला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!