उद्रेक न्युज वृत्त :-छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढलेली वाघनखे अखेर आज,१७ जुलै ला विशेष विमानाने लंडनहून मुंबईत पोहचली आहेत.ही वाघनखे सर्वसामान्यांना पाहता यावीत यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.
शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या मदतीने स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढला होता.इतिहासातील ही घटना अंगावर शहारा आणणारी आहे.शिवरायांची ही वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडे होती.ही वाघनखे आता राज्य सरकारने महाराष्ट्रात आणली आहे.ही वाघनखे आता मुंबईहून साताऱ्यात आणली जाणार आहेत.तिथे ती हिंदवी स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयात जनतेला पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत.यासाठी तिथे एक विशेष दालनही उभारण्यात आले आहे.या वाघनखांच्या स्वागतासाठी १९ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सोहळाही आयोजित करण्यात येणार आहे.

