Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीअखेर गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रे सुरू

अखेर गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रे सुरू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये,यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी केली जाते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ सेवा सहकारी संस्थाच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी करते.यावर्षी खरीप हंगाम २०२५-२६ साठी आदिवासी विकास महामंडळ सेवा सहकारी संस्थांची ५४ पैकी ४७ धान खरेदी केंद्रे शुक्रवार,२१ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली असून येत्या,मंगळवार २५ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष धान खरेदी करण्यात येणार आहे.त्यानुसार कुरखेडा तालुक्यातील-१७ खरेदी केंद्र, कोरची तालुका-७ खरेदी केंद्र,आरमोरी तालुका-३  खरेदी केंद्र,गडचिरोली तालुका-१ खरेदी केंद्र,धानोरा तालुका-८ खरेदी केंद्र,चामोर्शी तालुका-४ खरेदी केंद्र,देसाईगंज(वडसा) तालुका-१ खरेदी केंद्र,सिरोंचा तालुक्यातील-६ खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.सदर खरेदी केंद्रांचे संचालन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि महामंडळाच्या माध्यमातून केले जात आहे. शासनाच्या आधारभूत किंमत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या अधिकृत खरेदी केंद्रावर विहित नियम व अटींचे पालन करून धान विक्री करावी आणि अधिकृत पावती घ्यावी,असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक,गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

देसाईगंज-आरमोरी काँग्रेस कमिटीची “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या सिंधू भवन येथे आज,शुक्रवार १७ एप्रिल रोजी तालुका काँग्रेस कमिटी देसाईगंज-आरमोरी यांच्या वतीने आयोजित “संघटन सृजन अभियान-पदाधिकारी बैठक” उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!