उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- ‘ अरे तू…. कितीही दिवस उपोषण कर; नाहीतर मरून जा’..मला त्याच्याशी काहीही देणे-घेणे नाही.अशी गडचिरोलीचे विभागीय वन अधिकारी गणेशराव झोळे यांची मन धारणा झाली असावी; त्यामुळेच ते चालढकल करून दिवसेंदिवस आमरण उपोषण वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.आज ७ ऑक्टोंबर २०२३ रोजी आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांचा उपोषणाचा १३ दिवस सुरू असूनही मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने ‘मजा मारे अधिकारी अन् उपोषण कर्त्याची तब्बेत नाही बरी’…. असे झाले आहे.त्यामुळे अखेर आमरण उपोषणकर्ते सत्यवान रामटेके यांची प्रकृती खालावली असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विभागीय वन अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल आमरण उपोषण कर्त्याची घेत नसून आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.त्यामुळेच मी कशी काय कार्यवाही करू?अशी बतावणी झोळे करीत आहेत.रामटेके यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की,कुठली तरी कार्यवाही करावी.मात्र झोळे हे उडवा- उडवीची उत्तरे देऊन हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.रामटेके यांच्या मतानुसार,दिलेली तक्रार खोटी असेल तर माझ्यावर कार्यवाही करा; अन्यथा तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संपूर्ण दस्तऐवज उपोषणस्थळी आणून पाहणी करू व त्या नंतरच कार्यवाही करू; तसेही गणेशराव झोळे करीत नसल्याने संबंधितांना त्यांच्याकडून वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे त्यांच्यावर सुध्दा कार्यवाही होणे अपेक्षित आहे. वरिष्टांशिवाय कनिष्ठ कुठलेही पाऊल पुढे टाकुच शकत नाही.त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी सत्यवान रामटेके यांनी केली आहे.
