Saturday, May 2, 2026
Homeउमरेडअंगाचा थरकाप उडविणारा जीवघेणा प्रसंग…-अगदी १० फुटांवर वाघोबा चौघांनाही होता बघत..

अंगाचा थरकाप उडविणारा जीवघेणा प्रसंग…-अगदी १० फुटांवर वाघोबा चौघांनाही होता बघत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

उमरेड(नागपूर) :- अगदी पहाटेच्या प्रहरी वाघाने डाव साधत एका गायीची शिकार केली.काहीतरी घडून गेल्याची चाहूल शिक्षक-कर्मचाऱ्यांना लागली होती.त्यानंतर अगदी सकाळच्या सुमारास ‘त्या’ निवासी शाळेतील कर्मचाऱ्यांनी जनावरे बांधलेले ठिकाण गाठले.दोन महिला,मजूर आणि मुलगा रक्तबंबाळ असलेल्या गायीला बघावयास गेले.वाघाने गायीची शिकार साधल्याचे लक्षात आले.’ते’ सर्वजण वाघाला शोधक नजरेतून बघत होते.दुसरीकडे अगदी १० फुटांवर वाघोबा चौघांनाही बघत होता,शिकार साधल्यानंतर वाघोबा अगदी इथेच आहे, हे त्यांना कळलेसुद्धा नाही.अंगाचा थरकाप उडविणारा हा जीवघेणा प्रसंग उमरेड तालुक्यातील चांपा येथील नवीन देसाई निवासी शाळेच्या परिसरात घडला.या प्रसंगाला चार दिवसांचा कालावधी लोटला असला तरी आजही वाघाच्या भीतीने येथील शिक्षक,कर्मचारी आणि निवासी विद्यार्थी कमालीचे भयभीत झाले आहेत.

उमरेड तालुक्यातील चांपा येथील निवासी शाळेत सध्या दहा विद्यार्थी निवासी आहेत.शिक्षक,कर्मचारी पाच आहेत.निवासी विद्यार्थ्यांना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळावे,या हेतूने जनावरे पालनाचे काम सुरू झाले.मागील काही वर्षांपासून वाघ या परिसरात नजरेस पडू लागला.दरम्यान,वाघाने दोन गायींची शिकारही साधली.दोनदा वाघाच्या हल्ल्यातून गोऱ्हेही बचावले.अनेकदा वनविभागाकडे शाळा परिसरातील ही गंभीर बाब मांडली गेली.वाघाचा वावर या भागात कमालीचा वाढला.या कारणाने मुलांना वाघाचा धोका होऊ शकतो,अशीही भीती व्यक्त झाली.दरम्यान,काही दिवसांपूर्वी अगदी पहाटे वाघाने गायीची शिकार केली. सकाळच्या सुमारास तुलाराम कुंभरे,शोभा ठाकरे, पुष्पा कुंभरे,मुलगा साहिल जयदेव यांनी जनावरे बांधलेल्या परिसरात पाहणी केली.रक्तबंबाळ मृत अवस्थेत गाय नजरेस पडली.चौफेर नजर फिरविली असता,अगदी १० फुटांच्या अंतरावर वाघ निवांतपणे बसला होता.लागलीच चौघेही जनावरांच्या गोठ्यात शिरले.तो काही वेळ बसून होता.पुन्हा इकडून तिकडे फेऱ्या मारू लागला.सुमारे २० मिनिटे हा थरारक प्रकार सुरू होता.त्यानंतर वाघ हळूच निघून गेला.वाघ परत गेल्याने चौघेही सुखरूप बाहेर पडले.सर्वांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली.काही वेळेतच वनविभागाची चमू घटनास्थळी पोहोचली.त्यांनी पंचनामा केला.

वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे विद्यार्थी,शिक्षक, कर्मचारी भयभीत झाले आहेत.वनविभागाने योग्य उपाययोजना करावी; अशी मागणी केली जात आहे. शिवाय तारेच्या कुंपणाचीही व्यवस्था करण्यात यावी; अशीही मागणी जोर धरत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!