- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेल्या भालांजन गावाशेजारील राजुरा धरण परिसरात असलेल्या विहिरीत एकाच वेळी पाच जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. स्थानिक नागरिकांना विहिरीत पाच जणांचे मृतदेह तरंगताना आढळल्याने त्यांनी त्याची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली.त्यानंतर,जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांची ओळख पटली.यात वडील,दोन मुले व दोन मुलींचा समावेश आहे.विजय मुसा किराडिया वय २७ वर्षे(वडील),प्रित किराडिया वय ८ वर्षे(मुलगा),प्राची किराडिया वय ६ वर्षे,पूर्वी किराडिया वय ४ वर्षे(मुली व पियुष किराडिया वय २ वर्षे(मुलगा)अशी मृतांची नावे असून सर्वजण जळगाव जामोद तालुक्याच्या राजुरा ग्रामपंचायत उमापुर(भालांजन)गावातील रहिवासी आहेत.
विजय किराडियाचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले होते.भांडण झाल्याने पत्नी चारही मुलांना घरीच सोडून इस्लामपूर येथील आपल्या माहेरी निघून गेली होती.त्यामुळे विजय आज सकाळी स्वतः घरचे काम करत होता.यावेळी त्याच्या वडिलांनी तू काम का करत आहेस?तुझी बायको कुठे गेली? असा प्रश्न केला.त्यातून झालेल्या वादातून विजय किराडिया याने आपल्या चारही मुलांना राजुरा धरण परिसरात नेत विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली.पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील तथा पोलीस पथक करीत आहेत.एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशा पद्धतीने अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.तब्बल पाच जणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही; पण हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
- Advertisement -

