- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुलचेरा(गडचिरोली) :-भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्टला मुलचेरा तालुक्याच्या अडपल्ली चक येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अडपल्ली चक येथे सकाळी जिल्हा परिषद शाळेत तर सायंकाळी महामाया बुद्ध विहाराच्या भव्य पटांगणात गावातील बौद्ध समाज बांधवांनी शूरवीरांना आदरांजली वाहून स्वातंत्र्यदिन साजरा केला.जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची भाषणे,समुहगीते व देशाच्या आधारावर अनेक प्रकारचे नृत्य सादर करण्यात आले.त्यानंतर आकाश नागोसे व राहुल बावणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात उपयोगी पडणारे नोटबुक,पेन-पेन्सिल मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद डी.झाडे (बौद्ध समाज अध्यक्ष अडपल्ली चक),कार्यक्रमाचे उपाध्यक्ष संदिप बि.निमसरकार (मुख्या.आदि.आश्रम शाळा तोहगाव), उद्घाटक मरिया कोरडे (पोलीस पाटील अडपल्ली चक),सहउद्घाटक कवी तथा लेखक प्रभाकर डी.दुर्गे तर प्रमुख पाहुणे म्हणून राहुल दुधे,खेमराज चांदेकर, पौर्णिमा निमसरकर,आकाश नागोसे,तुळशीराम बावणे,प्रतिमा झाडे,दिलीप चलावार,राहुल बावणे, गमतीदास अलोने हे होते.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा जीवक अलोने व रक्षा उराडे या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेमराज चांदेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात संदीप बि.निमसरकार व कवी तथा लेखक प्रभाकर डी.दुर्गे यांच्यातर्फे समस्त गावकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रम योग्यरित्या घडवून आणण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय अडपल्ली चक तसेच बौद्ध समाज अडपल्ली चकचे युवा गौरव उराडे,काजू दुर्गे,दिनेश जीवने,प्रमाग गलबले,सुजल वनकर व विशेष सहकार्य म्हणून सुदिप्ता गोटा, सुनीता पूनघाटे तसेच समस्त अडपल्ली चक येथील गाववासीयांनी मेहनत घेतली.
- Advertisement -

