Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! पोलिसांनंतर आता रेल्वे सुरक्षा दलाच्या नावाखाली नवीन सायबर फसवणुकीची पद्धत..

सावधान..! पोलिसांनंतर आता रेल्वे सुरक्षा दलाच्या नावाखाली नवीन सायबर फसवणुकीची पद्धत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सायबर फसवणूक करणारे चोरटे वेगवेगळ्या माध्यमांतून नागरिकांना जाळ्यात ओढू लागलेत.यात डिजिटल अरेस्ट,एपिके फाईल पाठवणे, आरटीओ चालान,लिंक पाठवणे,एडिट फोटो पाठवणे, मोबाईलद्वारे संपर्क साधून अंगणवाडी कर्मचारी बतावणी करून बँक खात्याविषयी माहिती घेणे वा नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या वापरून फसवणूक करू लागले.अश्याच प्रकारे चोरट्यांनी पोलिसांनंतर आता रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF)नावाखाली एक नवीन सायबर फसवणुकीची पद्धत समोर आली आहे.या फसवणुकीमध्ये,अज्ञात चोरटे साधारण लोकांना ‘डिजिटल अटक’ सांगून त्यांची फसवणूक करीत आहेत.फसवणूक करणारे लोकांना फोन करतात आणि त्यांना सांगतात की,त्यांचे नातेवाईक गॅस सिलिंडरसह पकडले गेले किंवा तिकिटाशिवाय रेल्वे प्रवास करीत असल्यामुळे आरपीएफच्या ताब्यात आहेत. त्यानंतर आरोपी कायदेशीर कारवाई आणि मोठ्या दंडाची धमकी देऊन ऑनलाइन पैसे उकळतात.या फसवणूक प्रकरणांची खास वैशिष्ट्ये म्हणजे,आरोपींनी आरपीएफशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.ते इतके धूर्त आहेत की,व्हिडीओ कॉलद्वारे बनावट आयडी, कागदपत्रे आणि नातेवाईकांच्या आवाजाचा वापर करतात.पीडितांना घाबरवून,ते पैसे हस्तांतरित करण्यास भाग पाडतात. आरोपी व्हॉट्सॲपद्वारे एक क्यूआर कोड पाठवून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात.याचवेळी, कायदेशीर कारवाईची धमकी दिली जाते आणि हे प्रकरण गोपनीय असल्याचे सांगितले जाते.अश्या प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांना जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे.विशेष म्हणजे,
आरपीएफ किंवा इतर कोणतीही तपास संस्था फोन किंवा व्हिडीओ कॉलवर दंड आकारत नाही आणि डिजिटल अटकसारखी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अस्तित्वात नाही.त्यामुळे,पीडितांनी घाबरू नये आणि ताबडतोब कॉल डिस्कनेक्ट करून सत्यता पडताळण्यासाठी पुढील पाऊले उचलणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!