Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीसार्वत्रिक विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत निवडणुक आयोगाने महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ कार्यक्रम जाहीर केलेला असुन दिनांक-१५ ऑक्टोंबर  २०२४ रोजीपासून आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात दिनांक- २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान व दिनांक- २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पुर्ण होणार आहे.
सदर निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष प्रचारासाठी झेंडे उभारणे,बॅनर्स,कापडी फलक,पोस्टर लावणे,नोटीसा चिटकवणे,घोषणा लिहीणे,कमान, पताका,कट आउट लावणे किंवा चिन्हे वापरातात, त्यामुळे अनेक वेळा दोऱ्या काटया व तत्सम भाग रस्त्यावर आडवा येवून रहदारीस अडथळा निर्माण होतो.त्यामुळे प्रचाराचे कालावधीत अशा किरकोळ कारणांवरून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण व वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो व शांततेचा भंग होऊ शकतो.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी गडचिरोली जिल्हातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने जनजीवन सुरळीत राहण्यासाठी, सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था जोपासण्यासाठी तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून सामाजिक तेढ निर्माण होवू नये; याकरीता  महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३३(२) (प) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक गडचिरोली जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात रहदारीस अडथळा होईल किंवा उजेड व हवा निर्वेधपणे येण्यास प्रतिबंध होईल,अशारितीने कोणत्याही सार्वजनिक रस्ता व सार्वजनिक जागेवर बॅनर्स लावणे,फलक लावणे,खांबावर झेंडे लावणे यास आदेशाच्या तारखेपासून निवडणुक क्षेत्रात निवडणुक प्रक्रिया संपेपर्यंतच्या कालावधीसाठी प्रतिबंध केला आहे.
सदर निवडणुकीचे काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या कोणत्याही उमेदवारांने खाजगी इमारत अथवा आवारात झेंडे उभारणे, बॅनर्स,कापडी फलक, पोस्टर लावणे,नोटीसा चिटकविणे व घोषणा लिहीणे इत्यादी वापर करावयाचा असल्यास त्यानी प्रथम जागा मालकाची लेखी परवानगी घेणे बंधणकारक आहे.तसेच सदर पोस्टर,झेंडे,बॅनर्स,जाहीराती,कापडी फलक,घोषणा नोटीसा चिटकवीणे इत्यादी यांची आवश्यकतेप्रमाणे संबंधित निवडणुक निर्णय अधिकारी यांची परवानगी घेवून संबंधितांना त्याबाबतचे माहिती द्यावी. सदर लेखी परवानगी संबंधीत पोलीस ठाणेला दाखवुन पोलीसांचा नाहरकत दाखला घेणे देखील बंधनकारक राहील. अशा रितीने खाजगी जागेवर लावलेले बॅनर्स,पोस्टर्स इत्यादी रहदारीस अडथळा होणार नाही,उजेड व हवा अडवली जाणार नाही हे पाहणे त्या पक्षाच्या उमेदवाराला बंधनकारक राहील.सदरचा मनाई आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्हा कार्यक्षेत्रात आज दिनांक- २९ ऑक्टोंबर २०२४ पासून ते दिनांक-२५ नोव्हेंबर  २०२४ पर्यंत लागू राहील.या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १३१ प्रमाणे कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!