Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसामान्य माणसाच्या नजरेत कायद्याचे राज्य पूर्णपणे कमकुवत झालेय.. - सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त...

सामान्य माणसाच्या नजरेत कायद्याचे राज्य पूर्णपणे कमकुवत झालेय.. – सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-न्यायालयांमध्ये विविध खटले प्रलंबित असून न्यायालये स्थापन केली पाहिजेत. देशात गुन्हेगारी वाढत चालण्याचे मुख्य कारण म्हणजे विविध गुन्ह्यांत सबळ पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटत आहेत. दिवसाढवळ्या खून व इतर घटना होऊनही यातील आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटतो.त्यामुळे सामान्य माणसाच्या नजरेत कायद्याचे राज्य पूर्णपणे कमकुवत झालेय,असे महत्वपूर्ण निरिक्षण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने आज,शुक्रवारी नोंदवले.तब्बल ५५ गुन्हेगारी खटल्यांचा सामना करणाऱ्या आरोपीने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले असता त्याच्या अर्जावर सुनावणी करतांना खंडपीठाने महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे.गुंडांबद्दल कोणतीही सहानुभूती बाळगता कामा नये.त्यांच्याविरोधातील खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी अधिक जलदगती न्यायालये स्थापन केली पाहिजेत.साक्षीदारांचे मन वळवण्यासाठी वेळ मिळावा म्हणून कुख्यात गुन्हेगारांशी संबंधित खटल्यांना जाणूनबुजून विलंब केला जातो,अशी गंभीर निरिक्षणे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने यावेळी नोंदवली.गुंडांबद्दल कोणतीही चुकीची सहानुभूती दाखवता कामा नये, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे,विविध गुन्ह्यांत सबळ पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटत असल्याच्या वस्तुस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!