Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसर्वसामान्यांना झटका..! आजपासून सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ..

सर्वसामान्यांना झटका..! आजपासून सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मध्यपूर्व आशिया,अमेरिका व युरोपियन खंडात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.महागाईची झळ सुरू असतांनाच आज, शनिवार ७ मार्चपासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.घरगुती १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची,तर व्यावसायिक १९ किलो सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.सदरचे दर हे आजपासून लागू करण्यात आले आहे.होळीपूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये वाढ करण्यात आली होती; परंतु घरगुती गॅसमध्ये वाढ करण्यात आली नव्हती.मात्र,आता झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामन्यांना मोठा झटका बसला आहे.सिलिंडरच्या किंमती ह्या स्थानिक टॅक्सनुसार वेगवेगळ्या राहू शकतात.जसे, गडचिरोली व इतर जिल्ह्यात घरगुती गॅसचे दर ९१८ रुपये होते,तर आता ते ९७८ रुपये झाले आहे.दर महिन्याच्या १ तारखेला किंवा विशेष परिस्थितीत तेल कंपन्या गॅसच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्यानुसार दर जाहीर करीत असतात.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!