Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीसंतांच्या भूमीत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या 'महापूजा' महानाट्याचा डंका... - यंदाचा तिसऱ्यांदा...

संतांच्या भूमीत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘महापूजा’ महानाट्याचा डंका… – यंदाचा तिसऱ्यांदा मिळालेला वाड्.मय पुरस्कार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-संत चोखामेळा,संत दामाजी,संत कान्होपात्रा आदी १४ संत ज्या जन्मभूमीने दिले व पंढरपूरच्या विठूरायांची ज्या नगरीवर कृपादृष्टी आहे; त्या मंगळवेढा गावातील शब्दकळा साहित्य संघाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट साहित्यस्पर्धा घेण्यात येते व साहित्यिकांना त्यांच्या दर्जेदार साहित्यनिर्मीतीसाठी ‘शब्दकळा उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने’ पुरस्कृत करण्यात येऊन दहा विजेत्या साहित्यिकांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात येते.शब्दकळा साहित्य संघाच्या स्पर्धेचे यंदा चोविसावे वर्ष नुकतेच पार पडले आहे.महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात विशेष मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी नाट्य वाड्.मय प्रकारात यावर्षी झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘महापूजा’ या महानाट्याची ‘शब्दकळा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार-२०२४’ साठी निवड करून एकप्रकारे ‘महापूजा’ महानाट्याचा संतांच्या भूमीसह राज्यात डंकाच गाजू लागला आहे.
काल,रविवारी ५ जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात झालेल्या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.लक्ष्मणराव ढोबळे (पालकमंत्री सोलापूर) व आम.समाधान (दादा) अवताडे (वि.प.सदस्य पंढरपूर मंगळवेढा),व  दत्तात्रय सावंत(वि.प.सदस्य, पुणे) यांचे हस्ते प्रा.शिवाजीराव काळूंगे (संचालक धनश्री परिवार), शिवानंद पाटील (चेअरमन, दामाजी शुगर),डॉ. शिवाजी शिंदे (सहा.कुलसचिव,अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर),डॉ.सुरेश शिंदे (ज्येष्ठ कवी), टि.एस.चव्हाण, डॉ.महादेव देशमुख,प्रा.दिलीप जाधव,हरिष बंडीवढार, मनोहर मुधोळकर,श्रीमंत लष्करे, प्रा.डॉ. वामनराव जाधव,ॲड.नंदकुमार पवार इ.साहित्यिक,व प्रा.डॉ.शशिकांत जाधव (स्पर्धा प्रमुख तथा साहित्यिक) यांच्या उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यिकांना सन्मानित आले.त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या ‘महापूजा अर्थात महासती सावित्री’ या नाटकाचे लेखनासाठी शब्दकळा उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार-२०२४ या  पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले.रोख रक्कम,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल, श्रीफळ व मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, विजेते साहित्यिक व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
‘महापूजा’ हे संपूर्ण झाडीपट्टीत गाजलेले महानाट्य असून या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग सादर झालेले आहेत.विशेष म्हणजे ‘महापूजा’ नाटकास यापूर्वी नागपूर येथील ‘साहित्य विहार’, व बोरगाव (जि.सांगली) येथील ‘आधार प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले असून यंदाचा तिसऱ्यांदा मिळालेला हा वाड्.मय पुरस्कार आहे.यामुळे संपूर्ण झाडीपट्टीची मान उंचावली आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे,प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे,प्रा.यादव गहाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ.योगीराज नगराळे,प्रा.डॉ.राजकुमार मुसणे,डॉ. दिपक चौधरी,रमेश निखारे,नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर व इतर साहित्यिक तथा कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!