Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीशेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; ‘कृषी ड्रोन’ च्या माध्यमातून खते व कीडनाशकांच्या फवारणीचा...

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; ‘कृषी ड्रोन’ च्या माध्यमातून खते व कीडनाशकांच्या फवारणीचा पथदर्शी उपक्रम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत जिल्हा परिषद कृषी विभागाने ‘कृषी ड्रोन’च्या माध्यमातून खते व कीडनाशकांच्या फवारणीचा पथदर्शी उपक्रम सुरू केला आहे.दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून शेती अधिक कार्यक्षम व सुरक्षित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे  यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये :
• शेतकरी गटांना प्राधान्य : जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs) व महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान व तांत्रिक सहकार्य
• ड्रोन पायलट प्रशिक्षण : स्थानिक युवक व महिला बचत गटांना ‘ड्रोन पायलट’ म्हणून प्रशिक्षण देऊन रोजगारनिर्मिती
• मुख्य पिकांवर लक्ष : भात पिकावरील ‘तुडतुडा’ (प्रमुख कीड) व इतर रोग नियंत्रणासाठी प्रभावी फवारणी
• दुर्गम भागात सेवा : जिथे शेतात जाणे कठीण आहे अशा भागात ‘फिरते ड्रोन केंद्र’ शेतकऱ्यांच्या बांधावर सेवा देणार.
पारंपरिक फवारणी पद्धतीत पाण्याचा व औषधांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.मात्र,ड्रोन तंत्रज्ञानामुळे सुमारे ९० टक्के पाण्याची बचत आणि २५ टक्के औषधांची बचत होणार असून फवारणी अधिक अचूक व प्रभावी होईल,असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांना होणारे फायदे :
• मजुरांच्या टंचाईवर प्रभावी उपाय
• कमी खर्चात अधिक क्षेत्रात जलद फवारणी
• विषारी औषधांच्या संपर्कामुळे होणाऱ्या अपघातांपासून संरक्षण
• उत्पादनक्षमता वाढीस मदत
हायटेक शेतीला चालना- सुहास गाडे
कृषी ड्रोनच्या या आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यात हायटेक शेतीला चालना मिळेल.शेती अधिक आधुनिक,सुरक्षित व कार्यक्षम बनण्यास मदत होईल व दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम परिवर्तनकारी ठरेल तसेच महिला बचत गटांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील,असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
गडचिरोली जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये दोन महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान देण्यात आले असून त्यांना ड्रोन चालकाचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात आधुनिकतेची नवी दिशा मिळत आहे,अशी माहिती कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!