Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीशेतकरी बांधव मेटाकुटीस; वीजबिल भरणा करावा की कर्जफेड करावी?

शेतकरी बांधव मेटाकुटीस; वीजबिल भरणा करावा की कर्जफेड करावी?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- सध्याच्या घडीला शेतकरी बांधवांपुढे मोठे अस्मानी संकट निर्माण झाले आहे.अशातच इकडे आड तिकडे विहीर काहीशी अशीच स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे. नेहमीच्या कीट-किटीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.मार्च एंडिंगच्या तडाख्यात शेतीसाठी उचल केलेल्या कर्जाची परतफेड तर आवाक्याबाहेरचे घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल अशी दुधारी तलवार सध्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर कायम आहे.त्यामुळे कर्जाची परतफेड करायची की वीजबिल भरायचे? असा दुहेरी प्रश्न शेतकऱ्यांपुढे आवासून उभा आहे. बहुतांश शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला कर्ज घेऊन आपल्या शेतमशागतीच्या कामाला लागतात. आपल्या शेतातून अधिकाधिक उत्पन्न व काढून कर्जाची परतफेड करून वर्षभर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी शेतकरी शेतात जीव वे पणाला लावून राबतो.मात्र,मागील हंगामापासून शेतकऱ्यांपुढे मोठे आवाहनच उभे झाले.कोरोना लॉकडाऊन काळात मजूरांची वानवा त्यातही अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने उत्पादनात घट या सर्व विवंचनेतून शेतकरी उठण्याच्या प्रयत्नात असतांना आता सुलतानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले. एकीकडे ऐन तोंडावर येऊन ठेपलेल्या मार्च एंडिंगच्या तडाख्यात बँकांकडून शेतकऱ्यांनी उचल केलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावला जात असताना दुसरीकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल तत्काळ भरा; अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यासंबंधाने बजावले जात आहे.अशा आर्थिक अडचणीच्या प्रसंगी शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करायची? की आवाक्याबाहेरचे घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल भरायचे? की वर्षभर कुटुंबाचे गुजराण करायचे? असा मोठे केविलवाणा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा येऊन ठाकला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!