- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात ते विविध शाळांना भेटी देऊन ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत.
भुसे यांचे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता शासकीय विश्रामगृह,गडचिरोली येथे आगमन होईल.त्यानंतर त्यांचा वेळ राखीव असून गडचिरोली येथे मुक्काम राहील.
गुरुवार १० सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ते जिल्ह्यातील शाळांना भेटी देणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता समाज कल्याण भवन सभागृह, गडचिरोली येथे आयोजित ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीस ते उपस्थित राहतील.दौरा आटोपल्यानंतर सायंकाळी ७ वाजता भुसे हे गडचिरोली येथून शासकीय वाहनाने चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
- Advertisement -

