Wednesday, October 28, 2026
Homeगोंदियाशालेय परिसराच्या १०० मीटर आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांचा दणका...

शालेय परिसराच्या १०० मीटर आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांचा दणका…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शालेय परिसर समोरील आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे गुन्हा आहे.बऱ्यापैकी लोकांना याविषयी माहीत असूनही जाणूनबुजून याकडे अनेकजण दुर्लक्ष करतांना दिसून येतात.त्यामुळे नाईलाजास्तव अनेकांना कारवाईस सामोरे जावे लागत असते.असाच प्रकार तिघांच्या बाबतीत उघडकीस आला आहे.शालेय परिसराच्या १०० मीटर आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तिघांना  पोलिसांनी दणका दिला.तिरोडा व ग्रामीण पोलिसांनी  ही कारवाई केली असून तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत.यामध्ये,तिरोडा तालुक्यातील ग्राम मेंढा येथील अनिल भय्यालाल सूर्यवंशी वय ५१ वर्षे हा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करीत असताना रविवारी रात्री पोलिस शिपाई रवींद्र चांदेकर यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे.
दुसरी कारवाई ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम फुलचूर येथे करण्यात आली.यामध्ये आरोपी अन्सारअली अख्तर अली सय्यद वय ३७ वर्षे याने हॉटेलच्या काउंटरमध्ये ५ सिगारेट विक्रीसाठी ठेवल्या होते.त्याची हॉटेल शाळा परिसरात असल्यामुळे पोलिस उपनिरीक्षक प्रीतमकुमार येरमे यांनी सायंकाळी ६ वाजता ही कारवाई केली आहे.तर तिसरी कारवाई चुलोद येथे पोलिस हवालदार मनोज भैसारे यांनी केली आहे.तिसरी कारवाई ग्राम चुलोद येथील शाळेच्या १०० फुटांच्या आतची असून आरोपी भूमेश साबुलाल मेश्राम वय ४५ वर्षे रा.चुलोद हा शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना पोलिसांनी त्याला पकडले.या तिघांवर संबंधित पोलिस ठाण्यात सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम कलम ६ (ब),२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून माजी प्राध्यापकाची केली हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोथली गावनजीक एका माजी प्राध्यापकाची अज्ञात मारेकऱ्यांनी विटांनी ठेचून हत्या केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ...

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!