उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर मतदार संघ,पुणे पदवीधर मतदार संघ,औरंगाबाद पदवीधर मतदार संघ,अमरावती शिक्षक मतदार संघ व पुणे शिक्षक मतदार संघाचा समावेश असून निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे.त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यानुसार,उद्या,मंगळवार २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असून,उमेदवारांचा फैसला लागणार आहे. दरम्यान,विविध मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी ही वेगवेगळी राहिली आहे.त्यातच, पुणे पदवीधर मतदारसंघांत सर्वाधिक मतदार तसेच सर्वाधिक ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.तर औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात ४१,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ३८ उमेदवारांनी निवडणूक लढवली.तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून २६ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.म्हणजेच तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात तब्बल १८२ उमेदवारांनी निवडणूक लढवली.त्यानुसार,या सर्व उमेदवारांचे भवितव्य उद्याच्या निकालात ठरणार आहे.
विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

