Thursday, August 13, 2026
Homeगडचिरोलीविद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एकलव्य व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा,विज्ञान व कला...

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एकलव्य व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा,विज्ञान व कला क्षेत्रात करणार मॅपिंग..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या क्रीडा,विज्ञान तसेच कला व संस्कृती क्षेत्रातील क्षमतांचे वयोनुसार मॅपिंग करून सविस्तर डेटाबेस तयार करण्यात यावा,असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पंडा बोलत होते.यावेळी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण एम.,जिल्हा भूसंपादन अधिकारी अस्मिता मोरे,शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सायन्स इनोव्हेशन,स्पोर्ट्स आणि आर्ट अँड कल्चर या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करून त्यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले. इयत्ता सहावी ते आठवी,आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी अशा वयोगटांनुसार विद्यार्थ्यांचे मॅपिंग करून जिल्हास्तरावर स्वतंत्र डेटाबेस तयार करण्याचे व या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, विज्ञान स्पर्धा तसेच विविध राष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की,चामोर्शी येथील एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून सध्या गडचिरोली येथे सुरू असलेले विद्यालय मूळ ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे.त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या जागेत नव्याने मंजूर झालेले केंद्रीय विद्यालय सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष भर👇
विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या सोशल मीडियाच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. आश्रमशाळा व एकलव्य विद्यालयांमध्ये नियमित समुपदेशन सत्रांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या मानसिक समस्या,तणाव व भावनिक अडचणींचे वेळेत निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले.
पायाभूत सुविधांची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश👇
आदिवासी विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या सर्व अपूर्ण बांधकामे व पायाभूत सुविधा विकासाची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.विशेषतः चामोर्शी येथील एकलव्य विद्यालयातील मुलांचे वसतिगृह तातडीने पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
वीज पुरवठ्याच्या तक्रारींचे तातडीने निवारण👇
आश्रमशाळा व एकलव्य विद्यालयांमधील वीज पुरवठ्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित वीज जोडणी व वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांचे त्वरित निराकरण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच क्रीडा,विज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम; गडचिरोलीतील स्टील हब व कौशल्य विकासाला चालना- उद्योगमंत्री उदय सामंत – ३६ हजार २११ कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याच्या...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातून उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याचे तसेच राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद पडल्याचे आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर...

राज्य शासनाकडून स्वतंत्र ‘गडचिरोली प्रदेश’ घोषित.. – मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वेगाने होत असलेले औद्योगिकीकरण,वाढत्या पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने संपूर्ण गडचिरोली महसुली जिल्ह्याचा समावेश असलेला...

आजपासून श्रावण महिन्यास सुरुवात; श्रावणात असणार चार सोमवार..

उद्रेक न्युज वृत्त :-हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.हा संपूर्ण महिना व्रतवैकल्य,धार्मिक विधी, भगवान शंकराची भक्ती,पूजा आणि उपवासासाठी...

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!