Tuesday, July 28, 2026
Homeगडचिरोलीवन्य प्राण्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या टोळीत कोरची तालुक्यातील आरोपींचा सहभाग.. -...

वन्य प्राण्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या टोळीत कोरची तालुक्यातील आरोपींचा सहभाग.. – बिबट्याचे कातडे जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी शहरात वन्य प्राण्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या तीन आरोपींच्या मुसक्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवार १९ फेब्रुवारीला आवळल्याची घटना उघडकीस आली होती.नागपूरचे विभागीय वन अधिकारी पी.जी.कोडापे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सडक-अर्जुनी वनपरिक्षेत्रात वाघ,बिबट्या वन्य प्राण्यांचे अवयव विक्री करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी वनपरिक्षेत्रात सापळा रचण्यात आला होता व बनावट ग्राहक तयार करून आरोपींसोबत बोलणी करून त्यांना सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील परिसरातून ताब्यात घेतले होते.तिन्ही आरोपींपैकी एकाकडे वाघ,बिबट्या यांच्या २२ नग मिश्या,खवले मांजराचे दोन दात व एक देशी कट्टा पिस्तूल आढळले होते.तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत वन कोठडी सुनावली होती.त्यानुसार सदर आरोपींनी साहित्य पुरविण्यात गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील काही व्यक्तींचा यात हात असल्याचे सडक अर्जुनीच्या वनाधिकाऱ्यांच्या पथकास सांगितले.सडक अर्जुनीच्या पथकाने कोरची तालुक्यातून दोघांना ताब्यात घेतले.यात नकुल प्रल्हाद शहारे वय ५७ वर्षे रा.कोहका व जितेंद्र गोविंदराव कराळे वय ३२ वर्षे असे आरोपींची नावे असून त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले आहे.सदरचे प्रकरण कोरची तालुक्यातील बेळगाव वनपरिक्षेत्रात येत असल्याने दोन्ही आरोपींना बेळगाव वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.त्यानुसार बेळगाव वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपीस न्यायालयात हजर केले असता
न्यायालयाने त्यांना सात दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.त्यातच वन्य प्राण्यांच्या अवयवांची विक्री करणाऱ्या टोळीत आणखी कोरची तालुक्यातील तिघांची नावे पुढे आल्याने काल शनिवारी दोघांना ताब्यात घेतले व एकाचा शोध सुरू असल्याचे वनाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.यात महेंद्र रामनाथ सहारे रा.कोहका व इंदर रामदास सहारे रा. गहाणेघाटा या दोघांचा समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!