Monday, August 10, 2026
Homeगडचिरोलीवनक्षेत्र सहाय्यकास १० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक.. - गडचिरोली ॲन्टी करप्शन...

वनक्षेत्र सहाय्यकास १० हजाराची लाच घेतांना रंगेहाथ अटक.. – गडचिरोली ॲन्टी करप्शन ब्युरोची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय कमलापुर येथील उपक्षेत्र राजाराम(खांदला)येथील वनक्षेत्र सहाय्यक(राऊंड ऑफिसर)महेश जयंतराव धामनगे,वय ४७ वर्षे यांना १० रुपयांची लाच रक्कम स्विकारतांना गडचिरोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ॲन्टी करप्शन ब्युरो) पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.सदरची कारवाई ही काल बुधवारी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,तक्रारदार हे तेलंगणा राज्यातील रहीवासी असुन त्यांच्या काकांच्या नावे असलेले ट्रक्टर ते स्वतः चालवतात.तक्रारदार हे सध्या राजाराम(खांदला) येथे मोबदला घेऊन शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतीचे काम करून देत असतांना दोन फॉरेस्ट गार्ड हे सदर ठिकाणी येऊन तकारदार याला ‘तुम वन जमीन पर अवैध रूपसे ट्रक्टरसे काम कर रहे हो,तुम्हारा ट्रक्टर ले जा रहे है’ असे म्हणुन तक्रारदार याचे ताब्यातील ट्रक्टर घेवुन गेले व नंतर तक्रारदार यांचेसोबत वनपाल(वनक्षेत्र सहाय्यक)महेश धामनगे यांनी संपर्क साधुन त्यांचेवर गुन्हा दाखल न करता कमी रकमेची दंडात्मक कारवाई करण्याचा मोबदला म्हणुन रूपये २५ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली.तकारदार यांना लोकसेवकास लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना फोन करून तक्रार नोंदविली.
सदर तक्रारीची पोलीस उपअधिक्षक विकांत सगणे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी दोन पंचासह नक्षलप्रभावीत क्षेत्रात जाऊन अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून पडताळणी केली असता वनपाल महेश धामनगे यांनी तक्रारदाराकडे तडजोडी अंती १० हजार रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने सापळा कारवाईचे आयोजन केले.  तकारदार यांचेवर गुन्हा दाखल न करता कमी रकमेची दंडात्मक कारवाई करण्याचा मोबदला म्हणुन महेश जयंतराव धामनगे हे बुधवार,२१ जानेवारी २०२६ रोजी १० हजार रुपये लाच रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले.प्रकरणी महेश धामनगे यांचे विरूध्द उप पोलीस स्टेशन राजाराम (खांदला)येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर,रात्री उशिरापर्यंत महेश धामनगे यांचे राजाराम खांदला व चंद्रपुर येथील निवासस्थानाची ॲन्टी करप्शन ब्युरो,गडचिरोली व चंद्रपुर यांचे कडून घरझडती घेण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.दिगंबर प्रधान, ॲन्टी करप्शन ब्युरो नागपूर परीक्षेत्र,श्रीमती माधुरी बाविस्कर अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि.नागपूर,  विजय माहुलकर अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक विकांत सगणे,पो.नि.किरण बगाटे,पोहवा किशोर जौंजारकर,पो.अं.संदीप उडान,प्रविन जुमनाके,नुतेश धुर्वे व चापोना राजेश्वर कुमरे यांचेसह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली आहे.
  • नागरिकांना आवाहन👇
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट)कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ ॲन्टी करप्शन ब्युरो गडचिरोली यांचेशी सपंर्क साधावे,असे आवाहन पोलीस उपधिक्षक विक्रांत सगणे यांनी केले आहे.
पोलीस उपअधीक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो कार्यालयः गडचिरोली
मोबाईल / व्हॉटसॲप कमांक- ७५८८०४१०६४
दुरध्वनी क्रमांक-०७१२-२९५०२०, टोल फ्रि क्रमांक- १०६४
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!