Monday, October 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरोहिणी पराडकर राज्यस्तरीय 'साहित्यरत्न कलाभूषण' पुरस्काराने सन्मानित..

रोहिणी पराडकर राज्यस्तरीय ‘साहित्यरत्न कलाभूषण’ पुरस्काराने सन्मानित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील युवा बौध धम्म परिषद महाराष्ट्र व कर्नाटक राज्य यांच्या तर्फे काल रविवारी भंते नागरत्नजी सभामंडप यशवंत मंगल कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात रोहिणी पराडकर यांना भंते नागरत्नजी राज्यस्तरीय साहित्यरत्न कलाभूषण पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी  प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित या होत्या,तर संस्थेचे संस्थापक प्रा.डॉ.किरण सदानंद भोसले,राज्याध्यक्ष प्रा.डॉ.संतोष भोसले,राज्य सचिव सतीश भारतवासी  उपस्थित होते.यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
रोहिणी अमोल पराडकर ह्या कोल्हापूर येथील प्रसिद्ध कवयित्री व साहित्यिक आहेत.व्यवसायाने त्या लेडीज फोटोग्राफर असून अनेक सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांचे सदस्य आहेत.त्यांचे “काव्यांजली,दत्त शब्दांजली,बालगीत,चिवचिवाट,काव्यसरीता आणि मधुबन” इत्यादी काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांना विविध स्पर्धांतून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.विविध वृत्तपत्रांतून व मासिकातून त्यांचे साहित्य नियमितपणे प्रकाशित होत असतात.विशेष म्हणजे, पराडकर या गडचिरोली नाट्यश्री स्पर्धेत सहभागी होत असतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गॅस एजन्सी धारकांचा संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशभरातील एलपीजी वितरक(गॅस एजन्सीधारक)कमिशनवाढ व इतर विविध मागण्यांसाठी आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी दिल्ली येथे आंदोलन करणार आहेत.एलपीजी डिस्ट्रीब्यूटर्स असोसिएशनने...

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!