Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना मिळणार नवी ओळख... - आयटीआयचे...

राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना मिळणार नवी ओळख… – आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पूर्वी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे पाहिजे त्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा कल नव्हता.जस,जसे औद्योगिक विकासक्षेत्र वाढत गेले तस,तशी मागणी वाढून विद्यार्थी तथा युवक स्वयंरोजगाराकडे वळू लागले.त्यानुसार ग्रामीण व शहरी भागातील युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे आणि खाजगी औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे,या उद्देशाने राज्यात ४१९ शासकीय व ५८५ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तेचे प्रशिक्षण मिळावे,यासाठी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सर्व संस्थांना निर्देश दिले आहेत.याचबरोबर प्रशिक्षण संस्थेच्या नावातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी,यासाठी विविध महनीय व्यक्तीमत्वांची नावे देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता.महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती.त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या.त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.यात नागपूर जिल्ह्यातील ८ संस्थांचा समावेश आहे.या व्यतिरीक्त गडचिरोली,गोंदिया, चंद्रपूर,भंडारा,छत्रपती संभाजीनगर,जळगाव,जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार,नागपूर,नांदेड,नाशिक, परभणी,बीड, बुलढाणा,मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर,वर्धा, वाशिम,सांगली,सातारा, सोलापूर,हिंगोली,अकोला,अमरावती आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली आहे.त्यानुसार आता राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना महापुरुष, सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे देण्यात आली असून तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!