Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीयेनापूर ते जयरामपूर मार्गावरील वाहतूक पाच दिवस राहणार बंद..

येनापूर ते जयरामपूर मार्गावरील वाहतूक पाच दिवस राहणार बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पोलीस स्टेशन आष्टी हद्दीअंतर्गत मौजा-कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचा लोह प्रकल्प सुरू आहे.या प्रकल्पासाठी मौजा-मुधोली चक नं.२,पारडी देव(रिठ)व जयरामपूर येथील खाजगी तसेच शासकीय जमिनीचे मोजमाप व भूसंपादन प्रक्रिया येत्या,बुधवार ११ मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे.सदर भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलने,निदर्शने किंवा विरोध प्रदर्शन होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून येनापूर ते जयरामपूर मार्गावरील वाहतूक उद्या,मंगळवार १० मार्च २०२६ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत तात्पुरती बंद करण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केला  आहे.यानुसार येनापूर ते जयरामपूर या मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक प्रतिबंधित राहील.मात्र,प्रवासी बसेस तसेच पाणी पुरवठा, महावितरण,दूरसंचार व रस्ते दुरुस्ती संदर्भातील अत्यावश्यक सेवा वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.सदर आदेश मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११६ अन्वये जारी करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!