Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीयेत्या १७ ऑगस्टपासून वितरीत होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी ......

येत्या १७ ऑगस्टपासून वितरीत होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी … – बँक खाते आधार संलग्न करण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली सारख्या नक्षल व दुर्गम भागात सोई-सुविधा नसतांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत १ लाख ५६ हजार ३५७ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी १ लाख ५३ हजार ५०२ अर्ज राज्य स्तरावर पडताळणी करुन पाठविण्यात आलेले आहेत.या अर्जाची राज्यस्तरावर निधी वितरणाकरिता पडताळणी केली असता सुमारे २० हजार महिलांचे खाते हे आधार क्रमांकाशी सलग्न नसल्याचे (E-KYC) नसल्याचे आढळून आले आहे. दिनांक- १७ ऑगस्ट २०२४ ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बालेवाडी,पुणे येथिल कार्यक्रमातुन पात्र महिलांना निधी वितरीत केला जाणार आहे.यात गडचिरोली जिल्हातील ज्या महिलांचे खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल त्यांचे खात्यात रक्कम वितरीत करतांना अडचण येणार आहे.
 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र महिलांचे खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नाहीत; त्यांनी तातडीने स्वतःचे मुळ आधार कार्ड,बँक पासबुक,जन्मतारखेचा पुरावा व स्वतःच्या किवा जवळचे नातेवाईकाचा मोबाईल घेवून आपले खाते असलेल्या बँक शाखेत,सीएससी केंद्र,सेतु सुविधा केंद्र, बँक व्यावसायिक मित्र  किंवा बँक सुविधा केंद्रात तातडीने जावून आपले बैंक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे किवा इ-केवायसी करुन घ्यावे; असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!