- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.ही योजना कायम चालू राहणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्यात आली आहे.ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार नाही.विरोधकांनी निवडणुकीनंतर योजनेत बदल झाल्याचा आरोप केला होता.मात्र,ही योजना अविरत चालू राहिल’, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.आता पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात ९ हप्ते वितरीत करण्यात आले आहेत.फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आतंरराष्ट्रीय महिला दिनी जमा झाला होता.
अशातच एप्रिल महिना सुरू होऊन १६ दिवस लोटूनही दहावा हप्ता महिलांच्या बँक खात्यात काही जमा झालेला नाही.त्यामुळे लाडक्या बहिणींची उत्सुकता शिगेला पोहोचली असल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच ३० एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे.त्यातच काही लाभार्थी महिलांच्या खात्यात ५०० रूपये जमा होत आहेत.५०० रुपये जमा होण्याचे कारण म्हणजे,ज्या महिलांना केंद्र शासनाच्या पीएम किसान व राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला १२ हजार रुपये जमा करण्यात येतात व लाडकी बहिण योजनेचे वर्षाला १८ हजार रुपये जमा करण्यात येतात.त्यामुळे फरकाची रक्कम म्हणून अश्या महिलांच्या खात्यात ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत.
- Advertisement -

