Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीमहिला लोकशाही दिनाचे आयोजन १६ ऑक्टोंबर रोजी 

महिला लोकशाही दिनाचे आयोजन १६ ऑक्टोंबर रोजी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे व त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा; यादृष्टीने महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करण्याकरिता सुचित केले आहे. 

त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो.सोमवार, दि.१६ ऑक्टोबर २०२३ रोजी सोमवार सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या दालनात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.या लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे,सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी असे प्रकरण स्विकारण्यात येणार नाहीत. 

तरी ज्या महिलांचे वरिल बाबी सोडून तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेअसतील अशा महिलांचे अर्ज १५ दिवसांपूर्वी विहीत नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे स्विकारण्यात येईल.जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गडचिरोली, बॅरेक क्र.१ खोली क्र.२६ व २७ कलेक्टर कॉम्प्लेक्स गडचिरोली या कार्यालयात नि:शुल्क उपलब्ध होईल,याची नोंद घ्यावी; असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!