Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर..

गडचिरोली जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील सार्वत्रिक / पोट निवडणूक असलेल्या एकूण १११ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  राज्य निवडणूक आयोगाच्य ३ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशान्वये माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकासाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच  ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात खालीलप्रमाणे राबविण्यात येत आहे.      

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ (शुक्रवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी ) १६ ऑक्टोबर (सोमवार) ते २० ऑक्टोबर २०२३ (शुक्रवार) सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी) २३ ऑक्टोबर (सोमवार) रोजी सकाळी ११ वाजतापासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ २५ ऑक्टोबर (बुधवार) रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत,निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ २५ ऑक्टोबर (बुधवार ) दुपारी ३ वाजतानंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ (रविवार) (गडचिरोली जिल्हयासांठी स.७.३० वा.पासून ते सायंकाळी ५.३० वा.पर्यंत) आणि मतमोजणीचा ७ नोव्हेंबर २०२३ (मंगळवार) रोजी होईल. 

तरी वरीलप्रमाणे  निवडणूक कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदारांनी/नागरिकांनी  सहकार्य करावे,  असे  जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडून आवाहन करण्यात येत असल्याचे निवडणूक विभाग, गडचिरोली यांनी कळविले आहे.

अशी आहे निवडणूक होणा-या (सार्वत्रिक / पोट) ग्रामपंचायतींची संख्या 👇

कोरची -१७  ग्रामपंचायती, कुरखेडा- ४, देसाईगंज -१, आरमोरी – १, गडचिरोली- ६, धानोरा- २६, चामोर्शी- ७, मुलचेरा-४, अहेरी-६, एटापल्ली-१३,भामरागड-१४ आणि सिरोंचा तालुक्यातील १२ अशा एकूण १११ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक/पोट निवडणूक होणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!