Sunday, June 21, 2026
Homeगडचिरोलीमहाशिवरात्री यात्रा संबंधाने पूर्वनियोजन आढावा..

महाशिवरात्री यात्रा संबंधाने पूर्वनियोजन आढावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये,यासाठी पिण्याचे पाणी,निवास,विशेषत: स्वच्छता,आरोग्य आणि सुरक्षेसंबंधी सर्व आवश्यक उपाययोजना भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र व चपराळा देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित होणाऱ्या यात्रे संबंधाने पूर्वनियोजन आढावा जिल्हाधिकारी यांनी आज गुरुवारी मार्कंडा येथील धर्मशाळेत घेतला.सदर बैठकीला उपविभागीय अधिकारी रणजित यादव,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी,उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप,तहसिलदार प्रशांत गोरूडे,गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच सरपंच आणि मार्कंडा व चपराळा येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रसंगी यात्रेच्या दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सोयी सुविधा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला.यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले.यात्रेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त,नियंत्रण कक्ष तसेच धर्मशाळांची दुरुस्ती करण्यात यावी.तसेच वैद्यकीय सुविधांसाठी औषधांचा पुरेसा साठा,वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.याशिवाय भाविकांसाठी अधिकच्या बसेसची व्यवस्था,अखंडित वीजपुरवठा,पथदिवे,मोबाइल शौचालयांची व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर द्यावा; असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष सोय👇
महाशिवरात्री यात्रेला हजारो भाविक येतात,त्यामुळे दर्शनासाठी लागणाऱ्या दीर्घ रांगांमध्ये स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष रांगेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.तसेच उन्हापासून बचावासाठी शेड आणि जागोजागी पाणपोई उभारण्याचे नियोजन करण्यात यावे,असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दर्शनाची वेळ वाढविण्याची मागणी👇
बैठकीत मार्कंडेश्वर मंदिरात यात्रेदरम्यान दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री १० ही वेळ वाढवून २४ तास सुरू ठेवावी,अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली. यावर पोलीस,आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणांसोबत चर्चा करून वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल,असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माहिती अधिकार कायद्यातील बदलांवर नाराजी; अण्णा उतरणार मैदानात.. – माहिती न देणाऱ्या चोरट्यांचे काय?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या आठवड्यात एक राजपत्र काढून माहिती अधिकार कायद्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत.शासनाने १२ जून २०२६ रोजी माहिती...

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!