Saturday, August 29, 2026
Homeरांचीमंत्री आणि पीए सह घरगुती नोकरास अटक..-मोजणीसाठी पाच नोटा मोजण्याचे यंत्र आणि...

मंत्री आणि पीए सह घरगुती नोकरास अटक..-मोजणीसाठी पाच नोटा मोजण्याचे यंत्र आणि बँक कर्मचारी करण्यात आले होते तैनात…-३५ कोटींवर रोकड जप्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

रांची :- झारखंडमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ३५ कोटींची रोकड जप्त केल्या प्रकरणी आज दिनांक- ७ मे रोजी झारखंडमधील झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांच्या पीएसह त्यांच्या नोकराला अटक केली आहे.ईडीने काल,सोमवार,६ मे रोजी आलम यांचे स्वीय सहायक (पीए) संजीव लाल आणि त्याचा घरगुती नोकर जहांगीर आलम यांच्याकडून ३५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती.मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्याच्या ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ‘ईडी’ने रांचीमधील एका फ्लॅटवर छापा टाकला.हा फ्लॅट मंत्री आलम यांचे पीए संजीव लाल यांचा नोकर जहांगीर आलम याचा आहे. ईडीने या फ्लॅटमधून ३२ कोटी रुपये जप्त केले.इतर ठिकाणी छापे टाकून तीन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.आतापर्यंत एकूण ३५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.दरम्यान, मंत्री आलम यांनी याप्रकरणी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचा दावा केला आहे.

ईडीने सोमवारी संजीव लाल आणि त्याचा नोकर जहांगीर आलम, बिल्डर मुन्ना सिंग आणि त्याच्या जवळच्या लोकांच्या नऊ ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली असून, मोजणीसाठी पाच नोटा मोजण्याचे यंत्र आणि बँक कर्मचारी तैनात करण्यात आले होते.छापेमारीत ईडीने रिअल इस्टेटची कागदपत्रेही जप्त केली आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!