Sunday, April 19, 2026
Homeसांगलीबारावीच्या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन आत्महत्या..

बारावीच्या परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
सांगली :-दुसऱ्या दिवशी बारावीचा पेपर असतांना परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच बारावीच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना सांगलीच्या मिरज येथे घडली.
प्रथमेश बाळासाहेब बिराजदार वय १८ वर्षे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्रथमेश बिराजदार काल सोमवारी रात्री खासगी क्लासवरून घरी परतला.क्लासमध्ये बारावीच्या परीक्षेला सामोरे कसे जायचे? याचे मार्गदर्शन करण्यात आले होते.घरी आल्यानंतर त्याने आपल्या बहिणीसोबत गप्पागोष्टी मारल्या.त्यानंतर अभ्यास करण्यासाठी तो दुसऱ्या खोलीमध्ये गेला.रात्री ९ च्या सुमारास त्याची बहिण जेवणासाठी बोलावण्यासाठी त्याच्या खोलीकडे गेली.तिथे प्रथमेश गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. भावाला लटकलेल्या अवस्थेत पाहून बहिणीने एकच हंबरडा फोडला. त्यानंतर त्याचे आई-वडील तिच्या दिशेने धावले.त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने प्रथमेशला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले.पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.प्रथमेश बारावीमध्ये शिकत होता.त्याचा आज पहिला पेपर होता.पण तत्पूर्वीच काल सोमवारी रात्रीच्या सुमारास त्याने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या कां केली? अद्याप कळू शकले नाही; मात्र त्याने परीक्षेच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!