Thursday, October 15, 2026
Homeगोंदियाबकऱ्यांचा चारा कशाला टाकला म्हणत केली बेदम मारहाण - बेदम मारहाणीत झाला...

बकऱ्यांचा चारा कशाला टाकला म्हणत केली बेदम मारहाण – बेदम मारहाणीत झाला मृत्यू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया : सिंधीटोला (कामठा) येथे आरोपीच्या घरासमोरील सिमेंट रोडवर शिवमंदिर शेजारी बिरसा मुंडा यांची प्रतिमा स्थापन करण्यासाठी बळीराम अनंतराम उईके यांनी चबुतरा तयार केला होता. त्या चबुतऱ्यावर आरोपी कुवरलाल आत्माराम तावाडे याने २२ जानेवारी रोजी सायंकाळी आपल्या बकऱ्यांना चारा देण्यासाठी चबुतऱ्यावर बकरीचा चारा टाकला. यातून दोघांत बाचाबाची झाली.२२ जानेवारीच्या रात्री ८ वाजता आरोपीने बळीरामला लाथाबुक्क्यांनी डोक्यावर,मानेवर मारून गंभीर जखमी केले.यात त्यांचा २३ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता मृत्यू झाला. यासंदर्भात शेवंती बळीराम उईके (५०) यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३२३, ५०४ सहकलम ३ (२), (व्ही) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!