Tuesday, August 25, 2026
Homeहिंगोलीफेरफार प्रकरणी तरुणाने तलाठ्याचा केला खून..

फेरफार प्रकरणी तरुणाने तलाठ्याचा केला खून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
हिंगोली :-जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी कार्यालयात फेरफार प्रलंबित राहण्याच्या कारणावरून तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून चाकूने भोसकून खून झाल्याची घटना आज,बुधवारी २८ ऑगस्टला दुपारी १२.३० वाजता घडली.संतोष पवार असे तलाठ्याचे नाव आहे.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,वसमत तहसील कार्यालयांतर्गत संतोष पवार हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत.त्यांना आडगाव रंजेबुवा व बोरीसावंत हे दोन तलाठी साजे देण्यात आले आहेत.मागील ३ वर्षांपासून ते या सज्याचे काम पाहत होते.
दरम्यान,आज सकाळी तलाठी संतोष पवार हे नेहमी प्रमाणे आडगाव रंजेबुवा तलाठी साजा कार्यालयात  कामकाज करीत बसले होते.दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास बोरी सावंत येथील एक तरुण दुचाकीवर कार्यालयात आला.यावेळी त्याने तलाठी पवार यांच्याशी फेरफारावरून बाचाबाची करण्यास सुरवात केली.अचानक त्या तरुणाने काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी पोटात चाकूचे वार झाल्यामुळे तलाठी पवार घाबरले.अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे जागेवरच कोसळले.त्यानंतर तरुण दुचाकीवरून आल्यापावली पसार झाला.
या घटनेनंतर घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाला.तो ऐकून गावकऱ्यांनी तलाठी साजा च्या दिशेने धाव घेतली.गावकऱ्यांनी तलाठी पवार यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र,उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील,उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह हट्टा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.
या बाबत पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सदर घटनेला दुजोरा दिला असून प्रलंबित कामावरून हा प्रकार घडला असावा; अशी शक्यता व्यक्त केली. मात्र,अद्याप या घटनेचे नेमके कारण समोर आले नाही.तलाठी पवार यांच्या टेबलवर मिरचीपूड पडलेली असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!