Tuesday, August 18, 2026
Homeगडचिरोलीपात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'जीवनदायिनी'.. गडचिरोली जिल्ह्यात ३१...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात ३१ रुग्णांना सुमारे ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना,पेपरलेस अर्ज प्रक्रिया,तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले.त्यासोबतच सामंजस्य करार,क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय,धर्मादाय रूग्णालय,संस्था,दाते आदींचे सहकार्य मिळत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे.परिणामी,अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.
  • २० गंभीर आजारासाठी मदत👇
कॉक्लियर इम्प्लांट(वय वर्ष २ ते ६),हृदय,यकृत, किडनी,फुफ्फुस,बोन मॅरो,हाताचे,गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट,कर्करोग शस्त्रक्रिया,रस्ते अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया,मेंदूचे आजार,हृदयरोग, डायालिसिस,कर्करोग(केमोथेरपी/रेडिएशन), अस्थिबंधन,नवजात शिशुंचे आजार,बर्न(भाजलेले) रुग्ण,विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा👇
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष,बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे.या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर)अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे.आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.
  • आर्थिक वर्षातील मदत👇
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.तर,याच कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील ३१ रुग्णांना सुमारे ३१ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील ३१ पात्र व गरजू रुग्णांना ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.ही योजना अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरत आहे.जलद,पारदर्शक आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे पात्र रुग्णांना वेळेत उपचारासाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे.गरजूंनी १८००१२३२२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता गडचिरोलीत होणार विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार,आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आणले जाणार हिमालयीन काळे अस्वल आणि लाल रानकोंबड्या..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाघ आणि बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे.केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने तब्बल सात वाघ...

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!