Wednesday, October 21, 2026
Homeगडचिरोलीपदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार तासांची विशेष सवलत (नैमित्तिक रजा)देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे.
सुरुवातीला खासगी आस्थापनांमधील मतदारांना मतदान करण्यासाठी दोन तासांची सवलत देण्याबाबत कळविण्यात आले होते.मात्र,काही ठिकाणी मतदान केंद्रांचे अंतर जास्त असल्याने मतदारांना प्रवासासाठी अधिक वेळ लागतो.ही बाब लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडून मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी ही सवलत दोन तासांवरून वाढवून चार तास करण्यात आली असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर आयुक्त(सा.प्र.)प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.अश्यातच महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी आज बुधवारी जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)येथील निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था आणि जिल्हा कोषागार कार्यालयातील स्ट्राँग रूमची पाहणी केली.
आयटीआय येथे त्यांनी निवडणूक कर्तव्यावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून साहित्य वाटपाच्या तयारीची माहिती घेतली.साहित्य वाटप सुरळीत होण्यासाठी नियोजन करण्याच्या तसेच परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या व सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पंडा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.त्यानंतर त्यांनी जिल्हा कोषागार कार्यालयातील मतपत्रिकांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी असलेल्या स्ट्राँग रूमची सुरक्षा व्यवस्था तपासली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संजय त्रिपाठी,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव,तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

जेवणातून विषबाधा; शेकडो नागरिक रुग्णालयात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अनेक नागरिकांना उलट्या,मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने...

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!