Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपतीला पोटगी देणे आवश्यकच……-इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयाने दिला महत्त्वपूर्व निर्वाळा….

पतीला पोटगी देणे आवश्यकच……-इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयाने दिला महत्त्वपूर्व निर्वाळा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पत्नी पतीकडून भरणपोषणाची मागणी करते.पण पत्नी पतीला भरणपोषणाचे पैसे देणार असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.बुधवारी न्यायालयाने पत्नीला दरमहा पतीला पाच हजार रुपये देण्याचे आदेश दिले.अमन वय २३ वर्षे आणि नंदिनी वय २२ वर्षे यांची मैत्री झाली.यानंतर दोघांमधील संवाद वाढू लागला.नदिनीने अमनला प्रपोज केले. पण अमनला लग्न करायचे नव्हते.त्यामुळे नंदिनी अमनला धमकावू लागली.यानंतर अमनने जुलै २०२१ मध्ये नंदिनीशी लग्न केले.दोघेही इंदूरमध्ये भाड्याच्या खोलीत राहू लागले.मात्र अमनचे कुटुंब या लग्नामुळे खूश नव्हते.अमनने सांगितले की, लग्नानंतर तो नंदनीसोबत ओलिस असल्यासारखा राहत होता. म्हणूनच अमन नंदिनीला सोडून गेला.नंदिनीने अमनच्या हरवल्याची तक्रार नोंदवली.तिथे घरी पोहोचल्यावर अमनने घरच्यांना सगळी हकीकत सांगितली.यानंतर अमनने त्याच्या वकिलामार्फत नंदिनीची पोलिसांत तक्रार केली.यानंतर अमनने फॅमिली कोर्टात मेंटेनन्स केस दाखल केली.मात्र,तिला अमनसोबत राहायचे आहे; असे नंदिनीने कोर्टात सांगितले.नंदिनीने न्यायालयाला सांगितले की,ती कोणतेही काम करत नाही; अशा स्थितीत दर महिन्याला ती देखभाल भत्ता कसा देणार ? मात्र पुराव्याअभावी नंदनी यांचा युक्तिवाद फेटाळण्यात आला.तिचा नवरा पैसे कमवतो,पण तिच्याकडे याचा पुरावा नव्हता; त्यामुळे हा युक्तिवादही फेटाळला गेला,असेही तिने कोर्टात सांगितले.

अमनने न्यायालयात सांगितले की, ‘मी १२ वी पास आहे.नंदिनीमुळे माझा अभ्यास सुटला आहे.तिने माझा छळ केला आहे.नंदिनीचे आई-वडीलही मला त्रास देत असत.मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता; पण नंदिनीच्या दबावामुळे माझा अभ्यास अपूर्ण राहिला.अमन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करताना नंदिनीने पोलिसांना सांगितले होते की, ती ब्युटी पार्लर चालवते.याचआधारे कोर्टात नंदिनीचा खोटेपणा उघड झाला. यानंतर न्यायालयाने नंदानी यांना मासिक खर्च म्हणून अमनला देखभाल भत्ता देण्याचे आदेश दिले.आता नंदनीला तिच्या पतीला देखभाल भत्ता म्हणून दरमहा ५००० रुपये द्यावे लागतील; असा निर्वाळा  इंदूरच्या कौटुंबिक न्यायालयाने दिला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!