Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीअबकारी विभागाने पकडला आष्टी जवळ विषारी दारूचा साठा…..

अबकारी विभागाने पकडला आष्टी जवळ विषारी दारूचा साठा…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

प्रा.मुनिश्वर बोरकर /गडचिरोली :- दारूबंदी जिल्ह्यात दारूचा पुर वाहत आहे.वैनगंगा नदि किणाऱ्यावरून अवैध दारूची तस्करी नेहमीच होत असतांनाचे हल्ली चित्र निर्माण झाले आहे.

कधि पोलीसाकडून दारू विक्रेत्यांना पकडल्या जाते तर कधि पोलीसाकडून कानाडोळा केल्या जातो.परंतु काल,शनिवारच्या रात्रौ आष्टी जवळील येनापूर मार्गावर अबकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अवैध दारूचा मोठा साठा पकडला असून त्यामध्ये विषारी तसेच दुप्लिकेट दारू पकडल्या गेली. अवैध दारू विक्रेते पैसे कमविण्यासाठी नकली दारू बनवून विक्री करीत आहेत.यात दुसऱ्याच्या जिवाची पर्वा केल्या जात नाही.अश्या विषारी दारूने अनेकांना आपले प्राण गमवावे लागते.मागील पाच वर्षांपूर्वी चामोर्शी रोड जवळील एका व्यक्तीने नकली दारू बनविण्याचा कारखानाच घरी तयार केला होता.काही महिन्यांनी नकली दारू बनविणाऱ्या त्या महाशयाला पोलीसांनी पकडले होते.आठ दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे एका इसमाकडून नकली दारूचे १४८ बॉक्स पकडले होते.यात दारू विक्रेता धांगी याला पकडण्यात आले.आता अशाच प्रकारे शनिवारला आष्टी पोलीस स्टेशन अर्तगत येनापूर रोड जवळ घडला असुन अबकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर ची कारवाई केली आहे.अभिनंदन कांबळे,सुदर्शन राठोड व मोनाली कुरडकर आदिनी शिताफीने अवैध दारू गाडीसहीत बॉक्सवर ब्याच नंबरही नकली असलेली मिलावटी दारूचे बॉक्से पकडले व यात दोन व्यक्तीना पकडले तर दोन व्यक्ती फरार झालेत.मिलावटी दारूनेही आता गडचिरोली जिल्हयात थैमान घातला आहे.मिलावटी दारू कॉमेक्स, आठवळी बाजार जवळ व गुजरी जवळही विकल्या जातो.हे गडचिरोली पोलिसांना माहीत असुनही सदर भागात राजरोसपणे मिलावटी दारूची सर्रास विक्री होत असतांना दिसते. सदर गंभीर बाबीकडे गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक निलोप्पल यांनी लक्ष घालावे; अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!