उद्रेक न्युज वृत्त :- मध्य प्रदेशचे सामाजिक न्याय मंत्री नारायण सिंह कुशवाह यांनी महिलांना अजब सल्ला दिला आहे. व्यसनमुक्तीसाठी घरातील माता-भगिनींना पुढे यावे लागेल,असे ते म्हणाले.बायकांनी पतींना घरी दारू प्यायला सांगावी म्हणजे हळूहळू लाजेमुळे दारू पिणे बंद होते.कुशवाह यांनी काल,शुक्रवारी भोपाळमध्ये व्यसनमुक्ती अभियानांतर्गत जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखवला.यावेळी ते म्हणाले की,दारूबंदी होऊनही दारू पिणारे राजी नाहीत.त्यामुळे या मोहिमेद्वारे लोकांना दारूपासून मुक्ती मिळू शकते. यामध्ये घरातील माता-भगिनींना सर्वात मोठे योगदान द्यावे लागणार आहे.जर पत्नीची इच्छा असेल तर ती आपल्या पतीला दारू पिणे बंद करू शकते.यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या पतीला समजावून सांगावे लागेल की,बाजारातील दारू पिण्यापेक्षा घरीच प्या.मग जेव्हा तो घरात बायको किंवा मुलांसमोर दारू पितो तेव्हा त्याला लाज वाटू लागते.त्यांना हेही सांगा की,त्यांच्या वडिलांना पाहिल्यानंतर मुलेही मोठी होतील आणि दारू पिऊ लागतील.हे ऐकून पतींना हळूहळू लाज वाटेल आणि ते दारू पिणे सोडन देतील.
पतीची दारू सोडविण्याचा मंत्र्याने महिलांना दिला गजबचा सल्ला….
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

