Saturday, October 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढील ३ वर्षात नक्षलवादापासून होणार मुक्त-केंद्रीय गृहमंत्री अमित...

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढील ३ वर्षात नक्षलवादापासून होणार मुक्त-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गत ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व सीएपीएफच्या सुविधांसाठी अनेक पावले उचलली आहेत.मग ती सीआरपीएफ असो किंवा सीमेवर तैनात असलेल्या इतर सर्व संघटना.पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश पुढील ३ वर्षात नक्षलवादापासून मुक्त होईल; असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.ते आसाममध्ये कार्यक्रमाला संबोधित करत होते.आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी तेजपूर येथील एसएसबी कॅम्पसमध्ये सशस्त्र सीमा बलच्या ६० व्या स्थापना दिनाला हजेरी लावली.

शाह पुढे म्हणाले,भारत-चीन युद्धानंतर एसएसबीची स्थापना १९६३ मध्ये झाली आणि जेव्हा अटलजींनी ‘एक सीमा एक बल’ धोरण लागू केले तेव्हा २००१ पासून एसएसबी फोर्स कार्यरत आहे.भारत- नेपाळ सीमा आणि भारत-भूतान २००४ पासून सीमेचे कर्तव्यदक्ष रक्षण करत आहेत.नक्षलवादाविरुद्धच्या लढ्यात एसएसबीच्या शौर्याचे कौतुक करताना शाह म्हणाले, सीआरपीएफ आणि बीएसएफसह एसएसबीने नक्षलवादी चळवळ संपवली आहे. एसएसबीने नेपाळ आणि भूतान या मित्र देशांच्या सीमांचे रक्षण करण्यासोबतच छत्तीसगड,झारखंड आणि बिहारमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध लढा दिला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमधील एसएसबीने सीआरपीएफ, बीएसएफ,जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करासह दहशतवाद्यांविरुद्ध लढताना आपल्या प्राणांची आहुतीही दिली आहे.

सरकारने एसएसबीच्या ६० व्या स्थापना दिनानिमित्त टपाल तिकीट जारी केले आहे.यामुळे देशातील जनतेसमोर एसएसबीचे कर्तव्याचे समर्पण नेहमीच जिवंत राहील.शाह पुढे म्हणाले,भारत आता संपूण जगात मोठी शक्ती म्हणून पुढे येत आहे.आपला देश २०४७ मध्ये संपूर्ण विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून समोर येईल.असेही त्यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

नागपूर विभाग पदवीधर निवडणूक; गडचिरोली जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी सर्वाधिक.. -विभागाची सरासरी ६४.७६ टक्के..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत प्राप्त अहवालानुसार दुपारी ४ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ७२.९५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण...

रस्त्याच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल; काम पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी परिसरातील खांदला–चिरेपल्ली आणि चिरेपल्ली–आलापल्ली या एकूण २२ किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. त्यांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!