Friday, July 31, 2026
Homeगडचिरोलीन्यायालयातून हिसका मारून पळून जाणाऱ्या आरोपीस ७ वर्षाची शिक्षा…-आरमोरी तालुक्यातील आरोपी…

न्यायालयातून हिसका मारून पळून जाणाऱ्या आरोपीस ७ वर्षाची शिक्षा…-आरमोरी तालुक्यातील आरोपी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- पेशी तारखेवर आरमोरी येथील न्यायालयात हजर करताना हिसका मारून पळून जाणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास एस.कुलकर्णी यांनी काल,गुरुवारी दि.२७ जून रोजी सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.अजय अरुण हजारे वय ३२ वर्षे रा.डोंगरी ता.आरमोरी असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की,५ मार्च २०२९ रोजी पोलिस हवलदार भाऊचंद गेडाम,पोलिस शिपाई नितेश चांदेकर व चालक रमेश बेसरा हे आरोपी अरुण हजारे हा चंद्रपूर कारागृहात बंदिस्त असल्याने त्याला आरमोरी येथील न्यायालयात पेशी तारखेवर हजर करण्याकरीता एमएच ३३ सी १४४ क्रमांकाच्या वाहनाने आणले होते.आरोपीस चंद्रपूर येथील कारागृहातून ताब्यात घेऊन हातकडीसह आरमोरी येथील न्यायालयात दुपारी १ वाजता पोहोचले.काही वेळाने न्यायालयात मध्यान्हाची सुटी झाल्याने आरोपीस पेशी करण्यास वेळ असल्याने त्याला प्रतीक्षालयात थांबवून ठेवण्यात आले.दरम्यान,२:४० वाजताच्या सुमारास आरोपी अजय हजारे हा न्यायालयातून हातकील-हातकडीसह हिसका मारून पळून जाऊ लागला.सोबत असलेले कर्मचारी नीतेश चांदेकर यांनी सदर आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला असताना,त्याने न्यायालयाच्या तळ मजल्यावरील भिंतीच्या लोखंडी रॉडला हिसा देऊन तोडले.वाहन चालक पिरमोहम्मद शेख तसेच न्यायालयातील कोर्ट मेहरर पोलिस शिपाई नागरगोजे व मंगेश डोनाडकर यांनी आरोपीला

न्यायालयाच्या संरक्षण भिंतीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडले.त्यानंतर न्यायालयात दुपारी ३:५ वाजता त्याला हजर करण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीविरुद्ध भरपूर पुरावे आढळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास एस. कुलकर्णी यांनी पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून काल,गुरुवारी आरोपी अजय हजारे यास कलम २२४ भादंवि अन्वये दोषी ठरवून दोन वर्ष कारावास व कलम ३३२ भादंविमध्ये ३ वर्ष तसेच कलम ४२७ भादंविमध्ये २ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल एस.यु.कुंभारे यांनी कामकाज पाहिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!