Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीनिवडणूक कर्तव्यात कसूर... पोर्ला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांच्यावर गुन्हा...

निवडणूक कर्तव्यात कसूर… पोर्ला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांच्यावर गुन्हा दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-निवडणूक कर्तव्यात कसूर  केल्याप्रकरणी पोर्ला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांच्यावर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये काल,शनिवारी १६ नोव्हेंबरच्या रात्री भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये व लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम १३४(१) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.(एफआयआर क्रं.८९१)
वन परिक्षेत्र मडावी यांची गडचिरोली विधानसभा संघातील पोर्ला क्षेत्रासाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात आली होती.दिनांक-११ व १३ नोव्हेंबरच्या प्रशिक्षण सत्रास ते अनुपस्थीत होते व त्यामुळे मतदान यंत्र तयार करण्याच्या कामात व्यत्यय निर्माण झाला.तसेच त्यांनी अनुपस्थित असतांनाच्या तारखेसाठी दिनांक-१४ नोव्हेंबर रोजी स्वाक्षरी केल्या. तसेच सदर दिवशी प्रशिक्षण न घेता निघुन गेले. निवडणूक कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मीना यांचे वतीने नायब तहसिलदार अल्पेश बारापात्रे यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने👇
निवडणूक कर्तव्यावरील कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेमूण दिलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे बजवाव्या,कर्तव्यात कसूर केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!