Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री मासिक कविता स्पर्धेतील पाचव्या सत्राचा निकाल जाहीर.. - आरमोरी,कुरखेडा तालुका व...

नाट्यश्री मासिक कविता स्पर्धेतील पाचव्या सत्राचा निकाल जाहीर.. – आरमोरी,कुरखेडा तालुका व नागपूर येथील विजेते कवी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोलीच्या वतीने मासिक उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर महिन्याला ही स्पर्धा विनाशुल्क घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत कवींना दिलेल्या विषयांवर कविता सादर करायची असून या कवितांमधून तीन उत्कृष्ट कवितांची निवड करण्यात येते.या कवितांना मासिक सर्वोत्कृष्ट कविता व कवीला सर्वोत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.कविता संवर्धन व वाचनसंस्कृती जोपासणे हा स्पर्धेमागचा उद्देश असल्याने पुरस्कृत कवींना पुरस्कार म्हणून पुस्तके व आकर्षक प्रमाणपत्राने नाट्यश्री वार्षिक महोत्सवात मान्यवरांचे गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे पाचवे सत्र नुकतेच पार पडले असून या सत्राकरीता भारताचे संविधान,निसर्ग प्रकोप तसेच न्याय व्यवस्थेचा बळी,असे तीन विषय देण्यात आले होते.यात २६ कवींनी सहभाग नोंदवून दिलेल्या तीन विषयांवर एकूण ४८ कविता सादर केल्या होत्या.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून देऊळगाव (ता.आरमोरी,जि.गडचिरोली), येथील समृध्दी पाथर यांच्या भारताचे संविधान या विषयावरील ‘समानतेचा अधिकार’ या कवितेस,सोनसरी (ता.कुरखेडा,जि.गडचिरोली)येथील सौ.मनिषा कुंजाम-हिळको यांच्या निसर्ग प्रकोप या  विषयावरील व्यथा शेतकऱ्यांची या कवितेस व अशोक कांबळे,नागपूर यांच्या न्याय व्यवस्थेचा बळी (फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण)या विषयावरील न्याय व्यवस्थेची क्रूर थट्टा या कवितेस सर्वोत्कृष्ट पुरस्कार घोषित करण्यात आले आहे; असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.या स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध समीक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर चंद्रपूर,प्रसिद्ध संशोधक प्रा.डॉ. जनबंधू मेश्राम व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी केले आहे.
कवींच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत प्रामुख्याने खेमदेव हस्ते,नथ्थुजी चिमुरकर, आत्माराम विठ्ठल बरडे,डॉ.चंद्रकांत लेनगुरे,बाबुलाल राठोड,मनिषा ऋषी कुंजाम,समृध्दी पाथर,धनश्री मिरे, मधुकर दुफारे,अशोक कांबळे,वसंत चापले,उकंडराव नारायण राऊत,यामिनी मडावी,निशा तोनगीरे, संजय कुनघाडकर,सौ.सुरेखा बोरकर,सुनील बावणे,शैला चिमड्यालवार प्रा.कु.सरिता बुटले, सोनाली रायपुरे-सहारे,पुरुषोत्तम दहिकर,सिध्दार्थ गोवर्धन,वंदना सोरते, सौ.मंगला कारेकर,ॲड.पी.डी. काटकर,सौ.सुजाता अवचट इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या येत्या,७ डिसेंबरच्या वार्षिक कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!