Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. - सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण लहर सुरू आहे.परत हवामान खात्याने काही ठिकाणी काल रविवारसह आज सोमवारीही उष्ण लहरींचा इशारा दिला आहे.विशेष म्हणजे,रविवारी विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी येथे नोंदविण्यात आली.सर्व रेकॉर्ड मोडीत काढून ब्रम्हपुरी येथे ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.तर चंद्रपूर ४५.६,वर्धा ४५.५,नागपूर ४५.४, अमरावती व गडचिरोली ४५.२,गोंदिया ४५,भंडारा ४४.८,अकोला व वाशिम ४३.४,यवतमाळ ४२.८ व बुलढाणा ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाने उकाडा वाढला.अश्यातच आता आज,सोमवार २५ मे पासून नवतपाला सुरुवात झाली आहे.नवतपा म्हणजे नऊ दिवसांचा काळ म्हणजेच २५ मे ते २ जून २०२६ पर्यंत,या नऊ दिवसांत उन्हाळ्यातील सर्वाधिक ऊन तापते, उन्हाळ्याच्या चार महिन्यांतील उन्हाची कसर या नऊ दिवसांत भरून निघते,असे म्हटले जाते.नवतपामुळे सूर्याची दाहकता आणखी वाढत असते.कडक उन्हात घराबाहेर पडणे जीवघेणेच ठरत असून,कष्टकरी लोकांना मात्र कामासाठी बाहेर पडावेच लागते.म्हणून उन्हाळ्याचे चार महिने लवकरात लवकर संपावेत,अशी कामना सर्व करतात.त्यातही मे महिन्यातील ऊन म्हणजे अंगाला भाजून काढणारे असते.घराबाहेर पडताच अंगाची लाहीलाही करणारे ऊन पडत असल्याने कधी-कधी आपले घर गाठावे,अशीच सगळ्यांची इच्छा असते. त्यामुळे नागरिकांनी जीवाची काळजी घेणे व दुपारी घराबाहेर पडणे टाळावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!