- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-दिवसा ऊबदार व रात्री थंडगार वातावरणाचे सत्र सर्वत्र कायम आहे.२४ तासांत पुन्हा किमान तापमानात घसरण होऊन काही ठिकाणी ८.८ अंशाची नोंद आहे,जी विदर्भात सर्वात कमी आहे. त्यामुळे गारठा आणखी वाढला आहे.नागपूरसह विदर्भातही पुढचे आठ दिवस गारवा राहण्याचा अंदाज आहे.
जानेवारीच्या दुसऱ्या दिवशीपासून १० अंशांच्या खाली गेलेले किमान तापमान त्याच ठिकाणी स्थिरावले आहे.रात्रीचा पारा सरासरीपेक्षा ३.८ अंशाने खाली असल्याने सूर्यास्त होताच हुडहुडीची जाणीव होत आहे.दिवसाचे तापमान मात्र रात्रीपेक्षा तीनपट व सरासरीपेक्षा २.८ अंशाने अधिक असल्याने काहीसा ऊबदार अनुभव येत आहे.हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार उत्तरेकडील वाऱ्यांमुळे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सामान्यापेक्षा कमी आहे.आठवडाभर असेच वातावरण कायम राहील,असा अंदाज आहे.१० जानेवारीपर्यंत नवीन वेस्टर्न डिस्टरबन्स तयार होत आहे.सध्या पश्चिमेकडील जेट स्ट्रीममुळे उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे.त्यामुळे जोपर्यंत उत्तरेकडील वाऱ्यांचा मध्य भारतावर परिणाम होत राहील तोपर्यंत थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.पहाटेचा गारवा जातपर्यंत कुणालाही कंबलमधून बाहेर पडण्याची इच्छा नसते.सकाळी सूर्याची किरणे पडल्यावर बाहेर निघण्याचा विचार केला जातो.सावलीत हलकीशी थंडी जाणवते. थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांनी ऊबदार कपड्यांचा वापर केला,तर रात्री उशिरा थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवल्या.
- Advertisement -

